आरोग्यमहाराष्ट्ररायगडशिबीर

श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत श्रीवर्धन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड-अलिबाग : ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, जसवली यांच्या वतीने दि. 20 सप्टेंबर रोजी राज्य परिवहन आगार, श्रीवर्धन येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांची विविध आजारांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी शिबिरास भेट देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.500शिबिरात एकूण 74 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 60 पुरुष आणि 14 महिला सहभागी झाल्या. तपासणीदरम्यान 58 नागरिकांना औषधोपचार, 14 जणांची अस्थिरोगविषयक तपासणी तसेच 2 बालरुग्णांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमास मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड यांचे सहकार्य लाभले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button