निवडमहाराष्ट्रमुंबई

बार्शीच्या वर्षा कुलकर्णीची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील कु. वर्षा वंदना विजयकुमार कुलकर्णी हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) पदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून, तिची या पदावर नियुक्ती झाली आहे.500000वर्षा ही बार्शी येथील सुलाखे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असून प्राथमिक शिक्षिका वंदना शरद कुलकर्णी यांची कन्या आहे. वर्षाच्या या यशाने संपूर्ण पंचक्रोशीत तिचे कौतुक होत असून, ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. वर्षाच्या या यशाबद्दल सुलाखे हायस्कूल चे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर यांचेसह सर्व शिक्षक आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून, तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button