बार्शीत क्रेडाई ग्रुपतर्फे कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बांधकाम व्यावसायिक आणि प्रॉपर्टी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बार्शीतील भगवंत मैदानावर क्रेडाई बार्शी ग्रुपतर्फे 7, 8 आणि 9 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यांतील बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार असून, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, प्रकल्प, आणि प्रॉपर्टी गुंतवणुकीच्या संधी यांची माहिती देण्यासाठी 56 स्टॉल्स उपलब्ध असतील. या स्टॉल्समध्ये विविध प्रकारच्या बांधकाम साहित्याचा समावेश असेल. यामध्ये सिमेंट, लोखंड, टाइल्स, फिटिंग्ज, पेंट्स, वॉटरप्रूफिंग सोल्यूशन्स, बांधकाम यंत्रसामग्री आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससारख्या अत्याधुनिक गोष्टींचा समावेश असेल.

क्रेडाई बार्शीचे अध्यक्ष सतीश अंधारे आणि प्रोजेक्ट चेअरमन इंजि. अमर काळे यांनी सांगितले की, “दर्जेदार बांधकाम साहित्याचे विक्रेते स्टॉल घेऊन प्रदर्शनात सहभागी होणार आहेत, आणि आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता. ग्राहकांना परवडेल अशा किमतीत घरे, फ्लॅट्स, प्लॉट्स आणि साहित्य उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”

प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी

बांधकाम व्यवसायिकांना त्यांच्या सेवांचे व प्रकल्पांचे प्रमोशन करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच, प्रदर्शनासाठी विविध स्वरूपातील स्पॉन्सरशिपच्या संधी देखील उपलब्ध आहेत.

क्रेडाई बार्शीचे कार्य

क्रेडाई बार्शी ही बांधकाम व्यावसायिकांची एक महत्त्वाची संघटना असून, ती ग्राहकांसाठी दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते. या प्रदर्शनाद्वारे बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यवसायिकांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.

या प्रदर्शनाद्वारे नागरिकांना प्रॉपर्टी गुंतवणुकीच्या उत्तम संधी, बांधकाम साहित्याची माहिती आणि विविध प्रकल्पांची माहिती मिळेल.

बुकिंग आणि प्रयोजन साठी संपर्क
सतीश अंधारे – +917057777707

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या