जयंतीबार्शी

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे हिंदवी स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, आणि अध्यात्मिक गुरू व तरूणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, जयंती निमित्त विनम्र अभिवादन व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे आज दिनांक १२/०१/२०२५ रविवार रोजी सकाळी ठिक ११-०० वाजता हिंदवी स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅसाहेब भोसले आणि आधुनिक भारताचे अध्यात्मिक गुरू व तरूणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ प्रमोद भंडारी यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ मासाहेब भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,क्लार्क विराज पतंगे,सेवक रेखा यादव,वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button