आंदोलनबार्शी

बार्शी तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा सोपल यांच्या मागणीवर जिल्हाधिकारी यांचे आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू नाहीत ते तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना समक्ष भेटुन केली असता जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार याना याबत आदेश दिले आहेत.

आज सोपल यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यात झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली .यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम बार्शी न प विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे उपस्थित होते.

अति पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतातील उभ्या पिकाबरोबर काढून ठेवलेले धान तसेच शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , नदी ओढे लगत च्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे शेतकरी अति पावसा च्या या संकटाने उध्वस्त झालेला आहे.

शासकीय पातळीवरून झालेल्या नुकसानी बाबत कोणत्याही दिलासादायक हालचाली नसल्याने नुकसानग्रस्त भयभीत आणि चिंताग्रस्त आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणांना पंचनाम्यासाठी आदेशीत करण्याची मागणी सोपल यांनी केली. यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रांत अधिकारी निकम आणि तहसीलदार सुनील शेरखाने याना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button