आरोग्यबार्शीसामाजिक

दीडशे गवकऱ्यांची मोफत डोळे तपासणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिबीरामध्ये नागरिकांची तपासणी करताना डॉक्टर

बार्शी : बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे मोफत डोळे तपासणी चेष्मे वाटप आणि मोतिबिंदू तपासणी शिबिर सोमवार (ता. ३) रोजी घेण्यात आले.यावेळी दीडशे गावकऱ्यांची डोळे तपासणी केली.चाळीस लोकांना मोफत चेष्मे वाटप करण्यात आले, तर ३४ लोकांना मोतिबिंदू असल्याचे तपासणीत आढळून आले.
छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था मालवंडी, एच.व्ही.देसाई हॉस्पिटल पुणे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मालवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजित करण्यात आले होते. मोतिबिंदू असलेल्या रुग्णांना पुण्यातील देसाई हॉस्पिटलमध्ये १९ ऑक्टोंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉक्टर मोहसीन पटेल, राजश्री घुगे,कैफ काझी यांनी डोळे तपासणी केली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष समाधान काटे, उपाध्यक्ष प्रवीण पाडुळे,किरण कदम यांनी केले होते.यावेळी आरोग्य केंद्रातील डॉ.अनिता बांगर,डॉ.प्रकाशकुमार कदम, विठ्ठल शेळके,श्रीमती लीके,नवनाथ गवळी, रामभाऊ घेवारे आशा सेविका उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button