दिनबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत मनुस्मृती दहन दिन व स्त्रीमुक्ती दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड भूमी मध्ये या देशातील जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, व गुलामगिरीची मानसिकता असणारे विषारी विचार मांडणारा ग्रंथ जाळला त्याच दिवसाचे औचित्य साधून आज आंबेडकरी समाज बार्शीच्या वतीने मनुस्मृती दहन व स्त्री मुक्ती दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी डॉ. मैत्रीयी संजय लंकेश्वर, आयेशा हन्नूरे मॅडम, रेखा सरवदे, स्नेहल लंकेश्वर, सुवर्णा शिवपुरे या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा भारताचे संविधान, शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. यु एफ जानराव, तानाजी बोकेफोडे, आनंद काशीद, दिनेश नाळे, ऍड.संतोष कसबे, डॉ प्रकाश लंकेश्वर, प्रमिला झोंबाडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अय्याज पठाण, दिलीप सरवदे, कुमार कांबळे, सचिन सोनवणे, महेदीमिया लांडगे, अर्जुन कांबळे, विनायक कांबळे, संभाजी कदम सर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार, कार्यक्रमास आर्थिक सहकार्य करणाऱ्यांचे,उपस्थित मान्यवरांचे आभार व सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button