कै. शंकर भिसे यांच्या कादंबरीचे अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शीतील दिवंगत लेखक कै. शंकर भिसे यांच्या ‘फरफट’ या कादंबरीचे प्रकाशन गुरुवार, दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे करण्यात आले.

ही कादंबरी कै. शंकर भिसे यांनी अण्णा हजारे यांना समर्पित केली होती व त्यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु, प्रकाशनपूर्वीच लेखक शंकर भिसे यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या मृत्यूपश्चात तब्बल सात वर्षांनी अखेर या कादंबरीचे पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले.

जागतिक स्तरावर पर्यावरण सरंक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. अहमदनगर या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी हे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे तसेच संस्थेच्या इंडोनेशियाच्या महिलाध्यक्षा मनिषा भुसा यांची विशेष उपस्थिती होती. तसेच संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव सौ. अर्चना जगताप, महिला निरीक्षक सौ. स्नेहा तांबे, पुणे शहर महिलाध्यक्षा सौ.लीना पंड़ित, संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा महासचिव विजय पडळकर, युवा निरीक्षक राजेश कुस्पे, कवी अशोक मोहिते आदी उपस्थित होते.

या अधिवेशन सोहळ्यात बार्शीपुत्र सेवानिवृत्त सैनिक कवी अशोक मोहिते यांना राष्ट्रीय साहित्य रत्न्र पुरस्कार २०२४, निवृत्त अधिक्षक अभियंता रमेशचंद्र म्हैसेकर याना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार, मनिषा भुसाळ यांना राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार, महिला उद्योजिका सौ. रेश्मा जाधव यांना राष्ट्रीय महिला उद्योजिका पुरस्कार तर राष्ट्रीय आध्यत्मिक मार्गदर्शिका पुरस्काराने अर्चना जगताप व लीना पंडित गोडबोले यांना सन्मानित करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या