जि. प. प्रा. शाळा रातंजन येथे आनंद बाजार उत्साहात संपन्न

0

आनंद बाजारात 32 हजार रु उलाढाल झाली

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी , वैराग : आज दि. २४/१२/२०२४ रोजी वार मंगळवार जि. प. प्राथ. शाळा रातंजन येथे बाल आनंद बाजार अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. तत्पूर्वी बाल आनंद बाजाराचे उद्‌घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आप्पा नागटिळक, आप्पासाहेब माने उपस्थित होते.

बाल आनंद मेळाव्यात कचोरी, भेळ, शेंगालाडू, वडापाव यासह अनेक खादयपदार्थ विक्रीस उपलब्ध होते. भाजीपाला, शालेय साहित्य, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने याजह अनेक वस्तूचे स्टॉल लावण्यात आले होते. यातून विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतला. सदर बाजारात विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती तथा मुख्याध्यापक व शिक्षक वृद्धांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या