बार्शीसत्कार

“सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना सन्मानपत्राचा गौरव,विधानसभा निवडणुकीत शांततेचे पालन”

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना विधानसभा 2024 निवडणूक शांततेने आणि शिस्तीने पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याकडून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी बार्शी तालुका पोलीस स्टेशनने विविध संवेदनशील गावांमध्ये शांततेचे वातावरण राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे यांच्या नेतृत्वाखाली, सर्व ठिकाणी शिस्तीचे पालन करत निवडणूक अत्यंत शांततेने पार पडली, ज्यामुळे ग्रामस्थांनी सुरक्षिततेची भावना व्यक्त केली. हे सन्मानपत्र त्यांच्या कार्यक्षमता आणि आदर्श पोलीस सेवा सादर करण्याबद्दल दिले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button