‘एमआयटी’ राष्ट्रीय सरपंच संसदेच्या प्रांताध्यक्षपदी ॲड विकास जाधव यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : एमआयटी संचलित राष्ट्रीय सरपंच संसदेची पुणे येथे राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या मीटिंगमध्ये राष्ट्रीय सरपंच संसदेच्या प्रांताध्यक्षपदी ॲड विकास जाधव यांचे सर्वानुमते निवड झाली. यावेळी निवडीचे पत्र राहुल कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संपूर्ण भारतात राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत व ग्रामपंचायतचा लोकप्रतिनिधी सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उद्देशातून सर्वांनी काम करावे असेही यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचा अध्यक्ष राहुल कराड यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
ॲड विकास जाधव यांनी मागील दहा वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात ग्राम विकासात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. कळमवाडी गावचे सरपंच ते राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रांताध्यक्ष यादरम्यान सरपंच उपसरपंच यांना मानधन मिळवून देणे, पंधरावा वित्त आयोगाचा निधीच्या अनुषंगाने त्रुटी दूर करणे, ग्रामपंचायतचे सक्षम करण्यासाठी पंधरा लाखापर्यंतची त्याने ग्रामपंचायतींनाच करण्याची परवानगी द्यावी यासाठीचा झालेला पाठपुरावा, थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा आणण्यासाठी केलेला पाठवा वा तसेच सरपंच पदावर कार्यरत असताना आदर्श सरपंच ते आदर्श गावापर्यंतचे तसेच राज्यस्तरावरील यशवंत ग्राम सारखे पुरस्कार जाधव यांना प्रदान झालेले आहेत. अशा अनेक कामामुळे जाधव यांनी संपूर्ण राज्यातील सरपंचांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. राज्यातील सर्व सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष केलेला आहे. कोणतेही सरकार असले तरी त्यांना धारेवर धरण्याचे काम ॲड जाधव यांनी केलेले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय सरपंच संसदेच्या प्रांताध्यक्षपदी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र विभाग निवड झालेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मधून अभिनंदनचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी प्रकाशराव महाले ज्येष्ठ लेखक सचिन वायकुळे, ज्ञानेश्वर बोडके, कैलास गोरे, कालिदास वाडेकर, विक्रमसिंह जाधव, उज्ज्वलाताई शेवाळे, रत्नाताई पिंगळे, सोमनाथ शिंदे, वाल्मिकराव सांगळे, दत्तात्रय डुकरे, शिवशंकर धवन, विकास माने, किशोर पाटील ल, अनिता खरात यांच्यासह सरपंच संसदेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.