उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या हस्ते गतनेता आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदाचे नियुक्त पत्र प्रदान

0

पुणे येथील भेटी दरम्यान सोलापूर शहरातील विविध विकास कामे व अडचणी संदर्भात चर्चा केली

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : सोलापूर महानगरपालिकेमध्ये मागील तीन टर्म नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा गटनेता आनंद चंदनशिवे यांची ओळख म्हणून सोलापूर शहरातील विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या सामाजिक व विकासात्मक राजकीय कार्यातील सहभाग पाहून मागील पाच ते सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेले मा. गटनेते आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्यावतीने मा. गटनेता आनंद चंदनशिवे यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पुणे येथील विविध विकास कामे व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेचे मा. गटनेते आनंद चंदनशिवे यांना पत्र प्रदान केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अजित (दादा) पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मा.गतनेता, आनंद चंदनशिवे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील अडचणी व विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सदस्य, नागरिक, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका तस्लिमा शेख, इरफान शेख, अविनाश भडकुंबे, चाचा सोनवणे, समाधान सकट व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या