क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शी शहर पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत वाहनचोर गजाआड, १० दुचाकी जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : १३ ऑगस्ट २०२६ बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत दोन सराईत वाहनचोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बार्शीसह पुणे, लातूर, येडशी, इंदापूर परिसरातून चोरी केलेल्या ४ बुलेटसह एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ८ लाख २० हजार रुपये आहे.

बार्शीतील राऊत चाळ, स्टेशन रोड येथील रहिवासी प्रतिक चंद्रकांत पवार यांची १ लाख २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० EFI (क्र. MH25AY2476) ही ६ ऑगस्ट २०२६ च्या रात्री घरासमोरून अज्ञाताने चोरली होती. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६०१/२०२६, BNS ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास बार्शी शहर पोलिसांचे डी.बी. पथक करत होते. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पथकाने तपासाचा धागा पकडला. त्यातून दोन संशयितांचे नाव निष्पन्न झाले. पथकाने सापळा लावून आकाश हरीचंद्र राठोड, वय १९ वर्षे, रा. कन्हेरगाव, ता. परळी, जि. बीड आणि ऋषिकेश महादेव सुरवसे, वय २१ वर्षे, रा. मांजरी, ता. व जि. लातूर या दोघांना ताब्यात घेतले.500चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील बुलेटसह आणखी ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ४ रॉयल एनफिल्ड बुलेट, ३ हीरो स्प्लेंडर/एचएफ डीलक्स, १ होंडा पेंशन प्रो आणि १ बजाज मोटारसायकलचा समावेश आहे. काही वाहनांचे रजिस्ट्रेशन आणि चेसिस-इंजिन क्रमांक संशयास्पद आढळले आहेत.

पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपींनी बार्शी व्यतिरिक्त लातूर, पुणे, इंदापूर आणि येडशी येथूनही वाहने चोरल्याचे सांगितले. जप्त केलेल्या इतर ९ वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलीस संबंधित जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांशी जुळवणी करत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात पो उप नि अभयकुमार माकणे, पोहेकॉ प्रवीण साठे, सुनिल बनसोडे, मपोहेकॉ शबाना कोतवाल, पोकॉ धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, अजिज शेख, अंकुश जाधव, दत्ता सोमवाड, अविनाश पवार, राहुल उदार, प्रल्हाद अकुलवार, सचिन नितनात, सतिश उघडे, सचिन राऊत तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोकॉ राहुल सोनकर यांनी ही कामगिरी बजावली.

वाहनचोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या कारवाईमुळे बार्शी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या वाहनांना डबल लॉक, डिस्क लॉक आणि जीपीएस ट्रॅकर सारखी सुरक्षा साधने बसवावीत. रात्रीच्या वेळी वाहन सुरक्षित ठिकाणी उभे करावे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button