निवेदनमहाराष्ट्रमोर्चासोलापूर

आयटक च्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कर्मचारी व अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेवर आयटक संलग्न अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर व शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा भव्य मोर्चा कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. निवेदन देण्यासाठी उशीर झाल्याने कामगार जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये घोषणा देत घुसले यावेळी पोलीसांनी त्यांना अडवले व मुख्याधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ घेऊन गेले.500मोर्चाचे निवेदन मुख्याधिकारी जैन यांना देण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर चर्चा करून सर्व मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांमध्ये सर्व पगार होण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा गेली सात महिन्याचा स्थगित पगार मिळावा, बोनस व गणवेशाला प्रत्येकी दीड हजार रुपये मिळावे, बॉन्ड लिहून घेण्याची पद्धत बंद करून नोकरीत कायम करावे, इंधन बिल भाजीपाला बिल कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर मिळावे, वेतन 30 हजार रुपये करा या मागण्या करण्यात आल्या. 500अर्धवेळ स्त्री परिचारांना सेवेत कायम करून तीस हजार रुपये वेतन द्यावे, बोनस दीड हजार रुपये मिळावे, प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले असता प्रवास भत्ता व जेवण भत्ता मिळावा, गनवेशाचे दिड हजार रुपये मिळाले, स्वच्छतेचे सर्व साधने मिळावी, जॉब चार्ट प्रमाणे काम घ्यावे या मुख्य मागण्या करण्यात आल्या.500यावेळी कॉम्रेड डॉ. प्रविण मस्तुद , कॉम्रेड लहू आगलावे, कॉम्रेड यशवंत फडतरे, कॉम्रेड राजेंद्र करली, कविता घळके, दिपक शिलेदार, विद्या झेंडे, बेबीताई कनिचे, अभिजीत संघेकर, भारत लोखंडे उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button