बार्शी

भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि.बार्शीच्या,परांडा शाखेचा 4 था वर्धापन दिन उत्साहात साजरा

B1न्युज मराठी नेटवर्क

परांडा : शाखेच्या 4 था वर्धापन दिना निमित्त भगवंत प्रतिमेचे पूजन उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे शाखा अधिकारी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परांडा येथे 2017 मध्ये बार्शीचे उदोजक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी परांडा येथे भगवंत मल्टीस्टेट चे शाखा स्थापना करण्यात आली होती.

परांडा शहर व ग्रामीण भागातील ग्राहक व ठेवीदार व छोटे मोठे व्यापारी व व्यावसायिक व उद्योजक व यांच्या सहकार्याने आज भगवंत मल्टीस्टेट 5 व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. भगवंत मल्टीस्टेट सोसायटी 4 वर्षे पूर्ण करून 5 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल भगवंत मल्टीस्टेट चे शाखा अधिकारी दिलीप ठोंबरे साहेब यांचा सत्कार करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे शाखा अधिकारी शिंदे साहेब व बाबर साहेब व ॲडव्हेकट वाघमारे साहेब व सुनिल भाऊ पवार भोञेकर व राजकुमार देशमुख व अमोल गोफणे पाटील व प्रतिष्ठित व्यापारी महावीर करळे, हेमंत जगदाळे, धोंडीराम मोहळकर, नरसिंग खैरे, अमोल थिटे,शेख अमन ,जाकीर मोमीन, व भगवंत मल्टीस्टेट चे कर्मचारी शेळके मारूती ,अमरजित पवार, भाऊसाहेब देशमुख, ज्ञानेश्वर लटके, डांगे जनार्धन, गुडे दिलीप, सुनिल आतकर, आदी उपस्थित होते शेवटी सर्वांचे भगवंत मल्टीस्टेट चे शाखा अधिकारी दिलीप ठोंबरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button