बार्शीमहाराष्ट्र

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी बार्शी आगार प्रमुखांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आगार मधील शौचालय यामध्ये महिलांना अडवणूक करून त्यांच्याकडून स्वच्छालयामधील कामगाराकडून आधीच्या पैशाची मागणी करण्यात येते. त्यामुळे महिला शौचालय यामध्ये न जाता बाहेर बाथरूम व शौच करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच महाराष्ट्र मध्ये महिलांबाबत चुकीच्या घटना घडत आहेत त्यामुळे आपल्या इथे देखील अशी एखादी घटना घडू नये याची खबरदारी म्हणून आज आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. शौचालय चालक कंपनी यांनी सदरील ठिकाणी दरपत्रक लावावे अशी देखील मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी छावा संघटना बार्शी शहराध्यक्ष निलेश पवार, किरण काकडे, प्रविण पवार, बंजरग पवार आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button