देशामध्ये पत्रकारांची गळचेपी होत असून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे : सुशीलकुमार शिंदे

0

पत्रकार दिनानिमित्त सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : पत्रकार दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या दैनिक वर्तमान पत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, प्रेस फोटोग्राफर, पत्रकार बांधवांचा सन्मान कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या व जेष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाजता काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी आयोजित केला होता. यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले कि, पत्रकार हे समाजाचे, राजकरणाचे मित्र असतात वास्तव दाखविण्यायाचे प्रयत्न करत असतात. पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर चिंतन, मनन करून लेखनी चालवावे पण हे अवघड काम आहे. पूर्वी पत्रकारांना स्वातंत्र्य होते. पण आजच्या जमान्यात त्यांच्यावर बंधने लादले जात आहे. दबाव टाकले जात आहे. त्यांची गळचेपी करुन त्यांचे स्वातंत्र्य काढून घेतले जात आहे. सोलापुरचे पत्रकार नेहमीच सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केले आहेत याहि पुढे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले कि, सोलापुर काँग्रेसचा एका खोलीतुन चांलणारा कामकाज मी मंत्री झाल्यानंतर प्रशस्त कार्यालय बांधण्याचा प्रयत्न केला सभागृहाला स्व. अप्पासाहेब ब्रह्मनाळकर यांचे नाव दिले आहे. आज गेली अनेक वर्षे भव्य कार्यालय उभा आहे. सध्या काँग्रेस भवनचे कायापालट करण्याचे काम सध्याचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकड़ून सुरू आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

या कार्यक्रमास मा. नगरसेवक विनोद भोसले, तौफ़ीक़ हत्तुरे, दत्तु बंदपट्टे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, अनुसूचित जाती अध्यक्ष उमेश सूरते, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, NK क्षीरसागर, सुशील बंदपट्टे, मा, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नागेश म्याकल, बसवराज म्हेत्रे, हारून शेख, अशोक कलशेट्टी, वसिष्ठ सोनकांबले, हेमाताई चिंचोळकर, हणमंतु सायबोलु, आशाताई म्हेत्रे, आश्विनीताई जाधव, रामसिंग आंबेवाले, श्रीकांत वाडेकर, रूपेश गायकवाड, मधुकर आठवले, उपेंद्र ठाकर, चंद्रकांत कोंडगुळे, सुमन जाधव, शोभा बोबे, संजय गायकवाड़, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, लखन गायकवाड़, सुभाष वाघमारे, अरुणा वर्मा, नागनाथ शावने, अंजली मंगोडेकर, सलीम मनुरे, सुनील सारंगी, दशरथ सामल, नासिर बंगाली, शकील शेख, शुभांगी लिंगराज, इरफान शेख, लता गुंडला, शाकिर सगरी, गौतम मसलखांब, आशुतोष वाले, आदित्य म्हमाने, अप्पा सलगर, अभिलाष अच्युगटला, अनिता ठमके, हेमा कोळी, नीता बनसोडे, चंदा काळे, मोहसिन शेख, बेलिफ़, चंदकला निजमल्लू, मुदसर बिराजदार, मुमताज तांबोली, मुमताज मदर शेख, सुनीता बेरा, मुमताज शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला तर आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार एजाज हुसैन मुजावर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या