डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुका उपाध्यक्षपदी रमण कारंजकर तर कोषाध्यक्षपदी भैरवनाथ चौधरी यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ‘डिजीटल मिडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र’च्या बार्शी तालुका उपाध्यक्षपदी ‘बार्शी विशेष’ चे संपादक रमण कारंजकर यांची तर कोषाध्यक्षपदी ‘बी वन न्यूज’ चे संपादक भैरवनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दै. नवशक्ती व फ्री प्रेस जर्नलचे समूह राजकीय संपादक राजा माने यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली ‘खमक्या इंडिया’च्या कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण यांनी रमण कारंजकर व भैरवनाथ चौधरी यांना नियुक्तीचे पत्र दिले.
या बैठकीस संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय (टिंकू) पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश मेटकरी, सचिव धीरज शेळके, खमक्या इंडियाचे संपादक अमित इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.