बस स्टँडवरील मोबाईल चोरीचा पोलिसांनी लावला छडा, आरोपी अटकेत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी बस स्टँडवरुन झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आले आहे. फिर्यादी सुनिल गोरख चव्हाण (वय- ३६ वर्ष, धंदा- शेती, रा. चिखर्ड ता. बार्शी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनिले हे मध्यरात्री गावाकडे जाण्यासाठी बस नसल्याकारणाने बस स्टँडवर झोपले असता दोन अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण करुन खिशातील १३,०००/- रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा वाय- १६ मॉडेलचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन नेला होता. त्याप्रमाणे बार्शी शहर पोलीस ठाणे गुरनं. ९२०/२०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाची तात्काळ् दखल घेवून गोपनिय माहीतीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन तासांच्या आत दोन संशयीत इसम नामे १) सुरज विजय कांबळे वय- २७ वर्ष, रा. पाटील चाळ, तुळजापुर रोड बार्शी, २) शाहरुख ईन्रुस शेख वय- २४ वर्ष, रा. भवानी पेठ, सोलापुर रोड बार्शी यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यानी गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी गुन्हयातील गेला माल १३,००० / – रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा वाय- १६ मॉडेलचा मोबाईल त्याचेकड्न जप्त केला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी जालीधर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि/ दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे व डी. बी. पथक यांनी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या