बार्शी तालुका नवीन रेशन दुकानांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 90 गावांमध्ये विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्यात आली आहेत. चालविण्यास इच्छुकांनी विहित नमुन्यात संबंधित तहसिलदार यांचे कार्यालय येथे दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पत्रकात म्हटले आहे, सध्याची रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून, आजमितीस रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्यात येत आहेत.
संबंधित गावातील पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था आणि महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्या गटाला/संस्थेस या गावात रास्तभाव धान्य दुकान परवाना चालविण्याची इच्छा असेल, त्यांनी विहित नमुन्यात संबंधित तहसिलदार यांचे कार्यालय येथे दिनांक 31 जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. सदरकामी संबंधित गावातील गटांना/संस्थेला अर्ज करता येईल. अर्ज कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. अर्जदाराने अर्ज स्वतः सादर करावेत. अर्जाचे विहित नमुन्यातील कोरे अर्ज तहसिलदार यांचे कार्यालयात रक्कम रु. 5 च्या चलनाने सरकारी खजिन्यात जमा करुन घेवून दिले जातील.
रास्त भाव दुकान बार्शी तालुका व दुकाननिहाय माहिती पुढीलप्रमाणेशी तालुका – मौजे १) बार्शी दु.क्र.५ २) उपळाई टो.दु. क्र.३६ ३) काळंबवाडी ४) काटेगाव ५) कापसी ६) खडकलगाव ७) गुळपोळी ८) अंबाबाईची वाडी ९) पांगरी दु.क्र.८६ १०) पिंपळगाव (धस) ११) बाभुळगाव १२) बोरगाव १३) तुळशीदासनगर १४) मालवंडी दु.क्र.१०४ १५) बार्शी दु.क्र.१४० १६) बार्शी दु.क्र.१५८ १७) अरणगाव १८) श्रीपतपिंपरी दु.क्र.१६१ १९) पांगरी १८९ २०) उपळाई टो. दु.क्र.१९३ व २१) वाघाचीवाडी