क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका मोनिका शेळके यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त, क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका मोनिका शेळके यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागामध्ये महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बार्शी तालुक्यातील बेलगाव येथील क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका मोनिका शेळके यांनी क्रांती बहुउद्देशीय संस्था, मथुरा – नारायण सार्वजनिक वाचनालय, कलायात्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय छावा संघटना इत्यादी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. या कामाची दखल घेऊन, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आशा वर्कर म्हणून काम करत असलेल्या सुवर्णा सुधाकर शेळके व महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सुनिता तुळशीदास शेळके यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी नानासाहेब रामगुडे यांनी केले.
याप्रसंगी बेलगावचे सरपंच जालिंदर भालेराव, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब रामगुडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य आगतराव शेळके, पीएसआय आश्रम शेळके, हनुमंत शेळके, चंद्रकांत शेळके, कैलास भालेराव, अण्णासाहेब शेळके, प्रकाश पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.