उद्घाटनमहाराष्ट्रवर्धा

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते बचतगट भवनाचे लोकार्पण

B1न्यूज मराठी नेटवर्क

वर्धा : ग्रामिण जीवन्नोती अभियान अंतर्गत बोरगाव मेघे येथील सुर्योदय प्रभाग संघ कार्यालयाच्या 21 लक्ष रुपये खर्च करुन बांधन्यात आलेल्या बचतगट भवनाचे लोकार्पण राज्याचे गृह निर्माण, गृह (ग्रामीण), शालये शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्थानी माजी जिल्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार होत्या तर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, ग्रामिण जीवन्नोती अभियान व्यवस्थापक निरज नखाते, माजी पंचायत समिती सदस्य दुर्गाताई ताजने, सुनिता मेघे, विस्तार अधिकारी सुनील गावंडे, नितीन डफरे, कल्याणी वानखेडे आदी उपस्थित होते.

बचतगट भवनातून महिलांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण उद्योग निर्माण करुन आर्थिक प्रगती करावी. केंद्र शासनाने बचत गटाच्या महिलांची आर्थिक उन्नत्ती साधन्यासाठी लखपती दिदी योजना सुरु केली असून या योजनेचा लाभ घेऊत गटातील महिलांनी करोडपती दिदी व्हावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.बचतगट भवनातील वीजबील शूल्य करण्यासाठी सोलर सुविधा निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असेही ते पुढे बोलतांना म्हणाले.

यावेळी बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे स्टॉल लावण्यात आले होते स्टॉलला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाला सुर्योदय प्रभाग संघातील असंख्य महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button