बार्शीमहाराष्ट्र

ज्युनिअर्स ग्लोबल प्री-स्कूल चे ५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा थाटात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्युनिअर्स ग्लोबल प्री-स्कूलचा विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम (वार्षिक स्नेहसंमेलन) व पारितोषिक वितरण सोहळा, शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध विषयांवरील गाण्यांवर उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले. तसेच समाजप्रबोधनपर दोन छोट्या लघुनाटीका सादर करत उपस्थितीतांची दाद मिळविली. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक, सायकलीस्ट, गिर्यारोहक चंद्रकांत बारबोले व माजी उपनगराध्यक्ष दशरथ जगताप, संचालक चारुदत्त जगताप, प्रणाली जगताप, किरण गायकवाड, तानाजी गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधले मॅडम, पवार मॅडम, सगर मॅडम, धामणेकर मॅडम, गुंड मॅडम तसेच भोसले मावशी आणि पवार मावशी यांनी अथक परिश्रम घेतले.

सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ब्रम्हदेव मोरे, पार्थ फुरडे, प्रज्ञा लोंढे, श्रेया देवकर यानी नृत्यदिग्दर्शन केले तर निवेदिका रुपाली शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button