प्रा. प्रेरणा स्वप्निल पाटील- प्राकृत विषयातून ‘ नेट ‘ उत्तीर्ण

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : यूजीसी नेट नवी दिल्ली मार्फत आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा ( नेट ) डिसेंबर २०२२ मध्ये प्रेरणा स्वप्नील पाटील या प्राकृत ‘ विषयातून उत्तीर्ण झाल्या आहेत. देशभरातून या परीक्षेसाठी ४७ विद्यार्थी बसले होते.
प्रा. प्रेरणा पाटील यांचे प्राथमिक शिक्षण रांगोळी येथील कन्या विद्या मंदिर रांगोळी , जिल्हा कोल्हापूर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रांगोळी, जिल्हा कोल्हापूर उच्च माध्यमिक शिक्षण पारिसाण्णा इंग्रोळे जुनिअर कॉलेज हुपरी , जिल्हा कोल्हापूर डी. एड. अध्यापक विद्यालय भरणे , जिल्हा रत्नागिरी एम. ए . (प्राकृत ) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर , बी.एड. श्री स्वामी समर्थ शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी जिल्हा सोलापूर एम ए (मराठी) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, येथून पूर्ण झाले आहे.
या यशात डॉ. महावीशास्त्री ( सोलापूर) , प्रा. महावीर पाटील ( सांगली ) प्रा. राहुल उपाध्ये ( सांगली ) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक पती स्वप्नील पाटील , सासुबाई सौ. सुरेखा व सासरे सुरेश पाटील व मुलगा मयंक, यांचे सहकार्य मिळाले.