क्राईमबार्शीमहाराष्ट्र

गुळपोळीत बंद घराचे कुलूप तोडून 2 लाखांहून अधिक ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथे बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे 2 लाख 9 हजार 900 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासाला वेग आला आहे.

फिर्यादी सदाशिव रेवनसिद्ध बारवकर (वय 67, रा. गुळपोळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट व इतर सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू असा एकूण 2,09,900 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.50000बारवकर हे गावी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ घराची पाहणी केली असता मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित बार्शी तालुका पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सदाशिव बारवकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305, 331(4) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून गुप्त माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.500009दिवसेंदिवस तालुक्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात किंवा नातेवाईकांकडे सोपवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button