बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दीड वर्षांपासून फरारी असलेल्या महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगरच्या डोंगराळ भागातून शिताफीने अटक

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : तालुका पोलिसांनी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल १५ महिन्यांपासून फरारी असलेल्या महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून शिताफीने अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शेतकरी आणि कामगारांचा वेष धारण करून दोन दिवस परिसरात गुप्तपणे वावरत तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि योग्य संधी साधत तिला ताब्यात घेतले.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अंतर्गत तक्रारदार मिसाळ यांनी त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिला सतत आपला ठावठिकाणा बदलत होती. नृत्य कलेचे कार्यक्रम करत ती राज्यातील विविध भागांत फिरत होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वारंवार मोबाईल क्रमांक बदलणे आणि राहण्याची ठिकाणे बदलणे अशा क्लुप्त्या वापरत असल्याने ती दीड वर्ष पोलिसांच्या हाती लागत नव्हती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र डोंगराळ भागामुळे मोबाईल लोकेशन अचूक मिळत नसल्याने पोलिसांनी वेगळी रणनीती आखली.

पोलिस पथकाने शेतकरी व कामगारांची वेशभूषा करून दीड दिवस परिसरात गुप्तपणे वावरत आरोपीच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली. अखेर योग्य संधी साधून राणी अरुण साळवे (भिवसने), वय २६ वर्षे, रा. बहुसिंगपुरा, जि. छत्रपती संभाजीनगर हिला ताब्यात घेण्यात आले.500या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

पोलिसांचे विशेष पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, युवराज गायकवाड, ओमप्रकाश दासरे,सिद्धेश्वर लोंढे

गुन्हा करून कितीही दूर पळाले, कितीही वेष बदलले आणि कितीही मोबाईल क्रमांक बदलले, तरी बार्शी तालुका पोलिसांच्या नजरेतून आरोपींची सुटका नाही, हे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या