वांगरवाडी/तावरवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे वांगरवाडी/तावरवाडी येथील विविध योजनेच्या माध्यमातून २ कोटी ४६ लाख रूपये मंजूर विकास कामांचे भूमिपूजन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बार्शी शहर व तालुक्यात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. यावेळी उपस्थित नागरिकांनी बऱ्याच वर्षांपासून न झालेली कामे ही आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचे सांगितले तसेच सभापती रणवीर राऊत यांनी गावकऱ्यां बरोबर संवाद साधत आमदार राजाभाऊ राऊत हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून शहर व तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामे मंजुर करुन आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
वांगरवाडी/तावरवाडी येथे सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी,अंतर्गत पाईपलाईन व विहीर करणे यासाठी ३८ लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन रस्ता करणे यासाठी ६० लाख, २५/१५ योजने अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख, जन सुविधा योजनेअंतर्गत काँक्रीट रस्ता करणे यासाठी १८ लाख,जिल्हा नियोजन समितीकडून १० लाख,जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे यासाठी १० लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे बार्शी तालुकाध्यक्ष मदन दराडे सर,पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश मांजरे, पंचायत समिती माजी सदस्य उमेश बारंगुळे, गणेश काळे, शुभम तुपे,सरपंच मनोज काळे, उपसरपंच अनंता जगताप, भगवान घोलप,बप्पासाहेब साळुंखे, ॲड. अविनाश जाधव, आण्णा लुंगसे, शेंद्रीचे सरपंच महादेव चव्हाण, सोसायटी चेअरमन राजेंद्र तुपे, प्रवीण तुपे, नंदकुमार तुपे,भैय्यासाहेब इंगळे, वाजीप पठाण, मंजूर पठाण तसेच इतर प्रमुख मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.