महाराष्ट्रयोजनासोलापूर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शन, नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने संवाद वारी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. उपक्रमात राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे, एलईडी व्हॅन, कलापथक व्हॅन तसेच चित्ररथ आहेत.

या प्रदर्शनाचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेले असून अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पुढील दोन दिवस हे प्रदर्शन राहणार असून या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन मांडणी करण्यात येणार असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती केली जाणार आहे. पुढील दोन दिवस हे प्रदर्शन अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात आहे. त्यानंतर पालखी मुक्काम असलेल्या पिराची करोली, बंडी शेगाव, वाखरी तसेच मुख्य प्रदर्शन पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेले आहे.
50000

अकलूज येथील प्रदर्शनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

संवाद वारी या उपक्रमांतर्गत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या चित्र प्रदर्शनाला अकलूजकर नागरिक तसेच पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अकलूज शहरात एलईडी व्हॅन द्वारे तसेच कालापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनाबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. येथून शासकीय योजनांची घडीपत्रिका नागरिकांना वाटप केली जात आहे.

या प्रदर्शनात 30 फ्लेक्स पॅनेलचा आहे, व त्यातून राज्य शासनाच्या 26 योजनांविषयी प्रबोधन केले जात आहे. यामध्ये पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार- एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत 30 लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय पशुसंवर्धन अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button