बार्शीमहाराष्ट्र

वाचन, मनन, चिंतन, प्रकटीकरण अध्यापनाचे प्रभावी सूत्र : डॉ. राहुल पालके

साधना कन्या प्रशालेत मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन व साधना कन्या प्रशाला, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एड. द्वितीय वर्ष व तृतीय सत्रातील सराव अध्यापन व शालेय आंतरवासितेच्या समारोपानिमित्त मार्गदर्शन व्याख्यान व समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राहुल पालके म्हणाले, “वाचन, मनन, चिंतन आणि प्रकटीकरण हे अध्यापनाचे प्रभावी सूत्र आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वाशी जोडून अध्यापन करावे. विद्यार्थ्यांना सर्व विषयांची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

काव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भावविश्व उलगडता येते. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची ओळख करून देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देता येते. बालसाहित्याच्या वाचनातून मुलांचे अनुभवविश्व समृद्ध होते, असेही डॉ. पालके यांनी सांगितले.500यावेळी शालेय विद्यार्थिनींनी आपली मनोगते उत्कृष्टपणे सादर केली. सराव अध्यापन व शालेय आंतरवासितेदरम्यान आलेले अनुभव, मिळालेले मार्गदर्शन आणि विकसित झालेली अध्यापन कौशल्ये त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. व्ही. डी. काळे यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. मुलींना शिक्षण तसेच विविध क्षेत्रांत दिल्या जाणाऱ्या सवलती व संधींचा ऊहापोह करताना, या सुविधांचा योग्य उपयोग करून मुलींनी आत्मविश्वासाने प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास गट मार्गदर्शक प्रा. डॉ. एम. ए. तोडकरी, अभिरूप मुख्याध्यापिका गीतांजली जाधव, अभिरूप पर्यवेक्षक जुबेर शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी धाडगे व अक्षता तनपुरे यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय कांबळे यांनी, तर आभार सुहास भुसारे यांनी मानले.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button