दिनमहाराष्ट्ररायगड

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रायगडमध्ये विविध उपक्रम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 5 विद्यार्थी पात्र

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रायगड : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अलिबाग समुद्रकिनारी 13 ऑगस्ट रोजी झालेल्या 5 किलोमीटर रेड रन स्पर्धेत 17 ते 25 वयोगटातील 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांमध्ये स्वागत समीर पाटील प्रथम, अक्षय राजा लेंडी द्वितीय तर मुलींमध्ये करिष्मा प्रकाश म्हात्रे प्रथम आणि मुग्धा नरेश पाटील द्वितीय ठरल्या. तृतीय क्रमांक अनुक्रमे यश दत्ताराम म्हात्रे व करिष्मा यशवंत हिरवे यांनी मिळविला. 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एचआयव्ही/एड्स विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्नेहा मुंडे प्रथम, वैष्णवी प्रमोद मोकल द्वितीय आणि रुचिता धारसे तृतीय ठरल्या.500रेड रनमधील मुलांचे व मुलींचे प्रथम-द्वितीय क्रमांकाचे विजेते तसेच प्रश्नमंजुषेतील प्रथम क्रमांकाची स्नेहा मुंडे हे २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

दरम्यान, 18 ऑगस्ट रोजी अलिबागमध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील 300 गावे, 320 शाळा आणि 65महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, मानसिक आरोग्य, मादक पदार्थांचा दुरुपयोग तसेच कलंक व भेदभाव याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ‘मिशन एड्स सुरक्षा अभियान’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात 95:95:99 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button