महाराष्ट्रसोलापूर

सात हजाराची लाच घेऊन तलाठी गेला पळून ; खाजगी इसम मात्र सापडला अँटीकरप्शनच्या जाळ्यात

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर सांगली महामार्गमध्ये गेलेल्या शेत जमिनीमधील पाईपलाईन बाधित झाली त्या पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई देण्या बदल्यात सात हजार लाचेची मागणी करून स्वीकारणारा पळून जाणे यशस्वी झाला मात्र लाच घेऊन तो तलाठ्याला देणाऱ्या खाजगी इसमाला लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

सुरज रंगनाथ नळे, व्यवसाय नोकरी पद तलाठी नेमणुक उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा कार्यालय व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण वय २२ वर्षे व्यवसाय शेती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तलाठी नळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

यातील तक्रारदार यांचे मित्राचे शेतजमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ सांगली – सोलापूर असा महामार्ग गेलेला असून त्यामध्ये शेतजमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित झाली आहे.. त्यामुळे सदर पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई रक्कम रुपये १,४३,७९४ रुपये मंजूर झाले असून सदर नुकसान भरपाई मिळणे करिता तक्रारदार त्यांच्या मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत असताना यातील आरोपी क्रमांक ०२ खाजगी इसम चव्हाण यांनी आरोपी लोकसेवक यांच्या वतीने लाचेची मागणी केली. व आरोपी लोकसेवक यांनी तडजोडीअंती ७००० रूपये लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान सदर लाच रक्कम रुपये ७००० रुपये आरोपी क्र १ यांनी स्वीकारून त्यांच्या चार चाकी वाहनातून पळून गेले आहेत. त्यानंतर आरोपी लोकसेवक यांना पकडण्याकरिता त्यांचे घराजवळ सापळा लावला असता आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन बेदरकारपणे तसेच कोणाच्याही जीवाची पर्वा न करता लाच रकमेसह वेगाने पळून गेले आहेत.

आरोपी क्र. १ नळे, तलाठी हे सापळा रक्कम स्वीकारून सापळा पथकाचे जीवितास धोका पोहोचेल अशा रीतीने वाहन चालवून भरधाव वेगाने निघून गेले आहेत त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत आरोपी क्र. २ चव्हाण यांना त्यांचे राहते निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार मुल्ला, घाडगे, सण्णके, उडाणशिव, सर्व नेमणूक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button