कृषीमहाराष्ट्रयोजना

पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 24 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहान

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कडील सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद उपकर योजनेमधून वैयक्तीक लाभाच्या विविध योजनेतील वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात यासाठी पात्र लाभार्थीनी २४ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जिल्हा परिषद डॉ. व्ही. डी. येवले यांनी केले आहे.

जिल्हा परिषद उपकर योजना

आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शेतमजुर व शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर ४ शेळया व १ बोकड वाटप
करणे.

पशुपालकांना मिल्कीग मशिन ५०% अनुदानावर पुरविणे.

वरील योजनांसाठी पात्र लाभार्थीकडून अर्ज मागविण्यात येत असून सदरचे अर्ज दिनांक ५ जानेवारी २०२६ पासून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या (www.zpsolapur) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख दिनांक २४ जानेवारी २०२६ आहे.

तरी इच्छुक पात्र लाभार्थींनी वरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जि. प. सोलापूर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर कूलदीप जंगम, मा. उपाध्यक्ष, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जि. प. सोलापूर तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद संदीप कोहिणकर व जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जिल्हा परिषद डॉ. व्ही.डी. येवले यांनी केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button