जयंतीबार्शी

गुळपोळी‌ येथे कालभैरव जयंती भक्ती भावाने उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गुळपोळी येथील श्री कालभैरव मंदिरामध्ये मंगळवारी श्री कालभैरव जयंती मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त श्री कालभैरव मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते व भैरवनाथ जयंती निमित्त शनिवारी पहाटेपासून अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रम सुरू होते.देवाची पुजा व दु १२: ०० काल्याच्या किर्तनाने सांगता झाली ह.भ.प इगळे महाराज सोलापूर कर यांचे किर्तन झाल्यानंतर भक्तांना सौ वंदना रामचंद्र उबाळे व समस्त देणगीदार व गावकरी यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

श्री कालभैरव जयंतीनिमित्त स्वरूप दर्शन मुर्तीचे उद्घाटन पुजारी बबुदादा गुरव व रामचंद्र बापूराव उबाळे यांचे हस्ते करण्यात आले. गुळपोळीसह बार्शी तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव आणी भक्तांनी जयंती उत्सवासह देवदर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. श्री कालभैरव अन्नदान व नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी जयंती उत्सवाच्या आयोजनाबद्दल प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. श्री कालभैरवनाथ जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन श्री कालभैरव अन्नदान व नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजिन करण्यात आले होते.

श्री भैरवनाथ जयंती चा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे, उपाध्यक्ष राजेंद्र अभिमान चिकणे, कार्यअध्यक्ष, लक्ष्मण मधुकर मचाले, उपकार्यअध्यक्ष राहूल मोहन मचाले, सेक्रेटरी राजेंद्र मचाले, उपसेक्रेटरी शहाजी चिकणे, खजीनदार हनुमंत लक्ष्मण पाटील, उपखजीनदार परमेश्वर लक्ष्मण मचाले, व अतुल सूर्यकांत चिकणे, शिवाजी सूर्यकांत चिकणे, प्रेम परमेश्वर मचाले, यश भैरवनाथ पवार, घनश्याम चिकणे, परमेश्वर चिकणे,राया सावंत, औदुंबर सावंत, महेश मचाले, काका पाटील, महेश चिकणे, रवि सावंत, अमोल सावंत, आदींसह व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले. जयंती उत्सवानिमित्त संध्याकाळी दिपोत्सव साजरा करण्यात आला व दुपारी १२:०० वाजल्यापासून सायंकाळी ९:०० वाजेपर्यंत अन्नदान करण्यात आले. श्री कालभैरव जयंती कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button