महाराष्ट्रयोजनासांगली

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यायोजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली, दि. 23 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या, सांगली या कार्यालयामार्फत व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्‍य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील महार, नवबौध्द, हिंदू – खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरूड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गामधील लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अनुदान योजनेसाठी 75 भौतिक उद्दिष्ट आहे. ही योजना 50 हजार रूपयांपर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रूपये हे अनुदान म्हणून व 25 हजार रूपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थीला दिले जाते.
बीज भांडवल योजनेसाठी 75 भौतिक उद्दिष्ट आहे. ही योजना 50 हजार 1 रूपये ते 5 लाखापर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे बीज भांडवल 20 टक्के व अनुदानाचा 50 हजार रूपयांचा समावेश आहे.

थेट कर्ज योजनेसाठी 24 भौतिक उद्दिष्ट आहे. ही योजना 1 लाख रूपयांची असून महामंडळाची बीज भांडवल रक्कम 75 हजार रूपये, अनुदान रक्कम 20 हजार रूपये पर्यंत दिली जाते व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.

अर्जदारांनी http://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून महामंडळाकडील सर्व योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड संभाजीनगर सांगली, 0233-2325659 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button