क्राईमधाराशिवमहाराष्ट्र

येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणारे तिघे जेरबंद

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

धाराशिव : येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेत महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 1 लाख 31 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत होते. 50000त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संशयितांवर नजर ठेवली असता ते गर्दीत चोरीचा प्रयत्न करताना आढळून आले.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन येरमाळा पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली.
अंगझडतीदरम्यान अनिल शिंदे याच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले.
50000चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, यात्रेत अंघोळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून ते अनिल शिंदे याच्याकडे जमा केले जात होते. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 31 हजार रुपये असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button