जयंतीबार्शीमहाराष्ट्रशिबीरसामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व संत बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त मालवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क59099

बार्शी : मालवंडी (ता. बार्शी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व संत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त श्रीमंत राजे प्रतिष्ठान व ग्रामस्थ मालवंडी यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.500या निमित्ताने दि. 31 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, मालवंडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 1 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

याशिवाय सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री 9 वाजता शैलेश लोखंडे यांच्या “मदनमंजिरी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.50000या कार्यक्रमास आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, बार्शी नगरपालिकेचे पदाधिकारी विजय (नाना) राऊत, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर (भैय्या) राऊत, पोलीस अधिकारी महेश माने, उद्योजक महेश (देवा) यादव, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान व आरोग्य तपासणीसारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये या जयंती उत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button