आरोग्यबार्शी

वैराग येथे ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील वैराग येथे ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असूनआमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. वैराग येथे चांगल्या ग्रामीण रुग्णालयाची गरज होती ती गरज ओळखून ३०खाटाच्या रुग्णालयाचा पाठपुरावा सुरू होता त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने या रुग्णालयाला मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय आज पारित करण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. सदर ३०खाटाच्या ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे बाबत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येईल, वैराग भागातील वाढती लोकसंख्या विचारात घेता हे ग्रामीण रुग्णालय या भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. हे रुग्णालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button