बार्शीत जागतिक महिला दिनानिमित्त ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

स्माईल क्लिकर फोटो स्टुडिओच्या वतीने स्पर्धेचे आयोजन , विजेत्या महिलांचा ट्राॅफी देऊन झाला सन्मान

बार्शी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील स्माईल क्लिकर फोटो स्टुडिओच्या वतीने व गायत्री ब्युटी पार्लर व नवकार गिफ्ट शाॅपीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली मायलेक ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धेचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रा.विजयश्री पाटील यांनी केले. बार्शी येथील शिवाजीनगर भागातील पाटील कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या मायलेक ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा प्रसंगी पाटील बोलत होत्या. साधना गोडसे, क्षमा पाटील व सोनाली नलावडे यांनीही समायोचित विचार व्यक्त केले. स्पर्धेत रोहिणी महेश प्रतापे यांनी प्रथम, अनुराधा रामचंद्र खटाळ यांनी द्वितीय तर स्नेहल गणेश पिसे व अश्विनी निलेश पाटील यांना तृतीय क्रमांक विभागुण देण्यात आला. स्पर्धेत अंजली उल्हास राक्षे, वंदना महेश गिरी, स्वाती नितिन ढेरे, अश्विनी मनोज क्षीरसागर आदी महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास त्यांच्या ड्रेसिंगच्या फोटोची एक सॉफ्ट कॉपी मोफत देण्यात आली.स्पर्धेत ड्रेसिंग मेकअप, कॉन्फिडन्स आणि आई मुलगी किंवा आपण केलेल्या ड्रेसिंग ची माहिती देणे यासाठी गुणांकनाचा विचार करण्यात आला.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गायत्री ब्युटी पार्लरच्या साधना गोडसे, प्रा. विजयश्री पाटील, क्षमा पाटील व सोनाली नलावडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी फोटो असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ सगरे,रामचंद्र यादव, बालाजी डोईफोडे, अमोल उमाप, मुन्ना बोधे, अमर वाघमारे, अमोल क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक साधना गोडसे, यांनी व सुत्रसंचलन अर्चना कंगले यांनी केले. आभार स्माईल क्लिकरचे अंकुश कंगले यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या