पुरस्कारमहाराष्ट्रसोलापूर

प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांना शैक्षणिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार, अभियंता दिनानिमित्त नवी मुंबई येथे गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक प्रा. डॉ. गणेश म. मा. काकांडीकर यांना शैक्षणिक प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘शैक्षणिक प्रशासक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभियंता दिनानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, नवी मुंबई स्थानिक केंद्र आणि फादर सी. रॉड्रिग्ज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ. गणेश काकांडीकर हे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शैक्षणिक प्रशासक असून त्यांना अभियांत्रिकी शिक्षण व प्रशासन क्षेत्रातील २७ वर्षांचा प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव आहे. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, उद्योग–शैक्षणिक संस्था सहकार्य तसेच संस्थात्मक विकास या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

नवी मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष डॉ. हरविंदर सिंह गंभीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई स्थानिक केंद्राचे अध्यक्ष सिंह होते. यावेळी निलज देशमुख, कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभियंते, शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.500अभियंता दिनाच्या निमित्ताने अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात शैक्षणिक प्रशासन, अभियांत्रिकी शिक्षण आणि संस्थात्मक नेतृत्व क्षेत्रातील प्रा. डॉ. काकांडीकर यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

प्रा. डॉ. काकांडीकर यांनी आपल्या २७ वर्षांच्या कार्यकाळात अध्यापन व संशोधनाबरोबरच शैक्षणिक प्रशासन, नवोपक्रम, उद्योजकता विकास, उद्योग–शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवकल्पनांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तंत्रज्ञानाधारित नवोपक्रमांना प्रत्यक्ष उद्योग व समाजाच्या गरजांशी जोडण्याच्या त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

या पुरस्काराबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकड़े यांनी प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य क्षेत्रातील कार्याला या पुरस्कारामुळे नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button