पंढरपूरमहाराष्ट्रसोलापूर

कार्तिकी वारीत रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या मदतीने १५ वर्षीय वारकऱ्याला जीवदान

चंद्रभागा नदीपात्रात प्रशिक्षण सुरू असतानाच बुडणाऱ्या भाविकाची सुटका; चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क350

पंढरपूर : कार्तिकी वारी २०२६ च्या अनुषंगाने चंद्रभागा नदीपात्रात नव्याने दाखल झालेल्या चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या वापराबाबत प्रशिक्षण सुरू असतानाच पाण्यात बुडणाऱ्या एका १५ वर्षीय वारकरी भाविकाला वाचवण्यात यश आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य करून भाविकाचे प्राण वाचवले.

चंद्रभागा नदीपात्रात चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या वापराबाबत प्रशिक्षण सुरू होते. यावेळी नदीच्या पाण्यात एक भाविक बुडत असल्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत आधुनिक रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या सहाय्याने संबंधित भाविकाला सुरक्षित बाहेर काढले. बाबलू खिलारे (वय १५, रा. मोहोळ, जि. सोलापूर) असे बचाव करण्यात आलेल्या भाविकाचे नाव आहे.350कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या मागणीनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एनडीआरएफ पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून नदीपात्रात बचावकार्य सुरू असून, आधुनिक उपकरणांच्या वापराचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

प्रशिक्षण सुरू असतानाच प्रत्यक्ष बचावकार्याची संधी मिळाली आणि रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या मदतीने एका तरुण भाविकाचे प्राण वाचवण्यात यश आले. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button