सहकार क्षेत्रातील निवडणुकीत रणवीर राजेंद्र राऊत यांची एन्ट्री!सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्यादित, सोलापूर या संस्थेच्या सर्वसाधारण मतदारसंघातून रणवीर राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांच्या कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी रणवीर राजेंद्र राऊत यांच्यासमवेत विविध सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.
सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था ही सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था मानली जाते. या संस्थेच्या सर्वसाधारण मतदारसंघातून रणवीर राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रणवीर राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेकडे सहकार क्षेत्रातील सर्व घटकांचे लक्ष लागले आहे.




