मदतमहाराष्ट्रयोजनासोलापूर

“गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मयत ऊसतोड कामगार यांचे वारसांना तसेच अपघातात जखमी झालेल्या ऊसतोड कामगारांना धनादेशाव्दारे आर्थिक मदतीचे वाटप”

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सोलापूर दि.19 : महारष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या अंतर्गत असलेल्या परंतु महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यात येते.

सदर योजनेतून ऊसतोड कामगारांचा मृत्यू व अपघात झाल्यास अथवा अपघातामुळे अपंगत्व आलेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या वारसांना व त्यांच्या कुटूंबांना अनुदान वितरीत करण्यात येते. यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. सदर योजनेंतर्गत पात्र व्यक्तींना अपघाताच्या स्वरुपानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येते.350सन 2026-27 मध्ये सोलापूर जिल्हयातील ऊसतोड कामगार व बैलजोडी यांचे घडलेल्या अपघातानुसार एकूण 22 प्रस्तावांना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ पुणे यांचेकडून रक्कम रू.45 लाख 16 हजार ,161 /-रकमेचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

आज दि.19 नोव्हेंबर, 2026 रोजी श्रीम. सुलोचना सोनवणे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना अनुदान धनादेश वितरीत करण्यात आले व इतर लाभार्थ्यांना डि.बी.टी व्दारे बँक खात्यावर अनुदान रक्कम वितरीत करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण,श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button