बार्शीमहाराष्ट्र

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडणार; आमदार दिलीप सोपल यांची ग्वाही

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या रास्त असून शासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. हिवाळी अधिवेशनापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मात्र, अधिवेशनापर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडू, अशी ग्वाही बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी दिली.

राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला असून बार्शी न्यायालयासमोरही ठिय्या आंदोलन सुरू आहे. गेल्या २२ महिन्यांपासून कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांकडून विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्यापही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.350या संपामुळे राज्यभरातील न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाले आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने तोडगा काढून संप मिटवावा आणि न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करावे, अशी अपेक्षा वकील वर्गातूनही व्यक्त होत आहे.

दरम्यान, आमदार दिलीप सोपल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन न्यायालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही दिल्याने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button