पंढरपूरमहाराष्ट्रसोलापूर

भक्तीसागर, वाळवंट, व पत्राशेड परिसरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा व वारकऱ्यांच्या सोयींचा घेतला आढावा; आवश्यक विकासकामे करण्याचे निर्देश

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क350

तनपुरे मठ येथे आंबे दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट

वारकरी हाच व्हीआयपी असल्याने स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले

पंढरपूर, दि. 19 : कार्तिकी वारी 2026 च्या अनुषंगाने प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या नियोजन व सुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील 65 एकर (भक्ती सागर), वाळवंट, चंद्रभागा नदीपात्र परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या आधुनिक स्वच्छता वाहनाचे उद्घाटन केले. त्यानंतर आरोग्य शिबिराला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला तसेच आपत्कालीन मदत केंद्रातील सुविधांची माहिती घेतली.

भक्ती सागर परिसरातील नदी घाटावर जाऊन त्यांनी घाटाच्या स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी स्वतः पाण्याचा फवारा मारून स्वच्छता केली. वारकरी भाविकांशी संवाद साधत त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती घेतली. परिसरातील भजनी मंडळांच्या सहभागाने विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला.35065 एकर परिसरातील काही भागाचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे निर्देश दिले. आवश्यक विकासकामांसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच वारकरी व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोफत उपलब्धता करण्यात आली आहे त्याचे उद्घाटन त्यांनी केले. त्यानंतर चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसरात वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहणी केली.

यावेळी वारकऱ्यांसाठी मोफत पाणी बॉटल चे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयांची स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. वाळवंटात आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या रुग्णालयाची पाहणी केली तसेच शरीरची माहिती घेतलीन. यावेळी चक्कर येऊन पडलेल्या भाविकांना तात्काळ या रुग्णालयात उपचार देण्यात आले. नदीपात्रात उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. नदीपात्रात बोट व होडीतून प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट अनिवार्य करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी स्वतःही लाईफ जॅकेट घालून बोटीतून प्रवास केला.350
पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली. तसेच या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेल्या सोयीसुविधांची ही पाहणी केली. या ठिकाणी भाविकांसाठी मोफत पाणी बॉटल वाटप च वितरणही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधला व प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधा विषयी त्यांचे मते जाणून घेतली.

उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्री विठ्ठलाचे मुखदर्शन
सर्वसामान्य वारकरी भाविक हा पायी चालत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतो. येथे अनेक तास दर्शन रांगेत थांबतो. तो वारकरीच खरा व्हीआयपी आहे, त्यामुळे त्या वारकऱ्याला वेळेत व सुलभ दर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले.

तनपुरे मठ येथे आंबे दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट

आंबे येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तनपुरे मठ येथे भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही मदत 21 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात संबंधित कुटुंबांना धनादेशाद्वारे वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.350तसेच, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबातील मुलाला नोकरी मिळवून देण्याची आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतली. या माध्यमातून दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे, नगराध्यक्ष प्रणिती भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button