श्री. गणेश वस्त्र दालनाच्या लकी ड्रॉ मध्ये बुलेट गाडीचा विजेता ठरला सुनिल कदम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

कॉमेडी किंग राहुल इंगळेच्या कार्यक्रमात उडाले हस्याचे फवारे

बार्शी : बार्शी शहर व परिसरात अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या श्री. गणेश या भव्य कौटुंबिक वस्त्र दालनात फॅमिलीसाठी गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या योजनेचा भव्य लकी ड्रॉ चा कार्यक्रम लिंगायत बोर्डिंग येथे बुधवारी संपन्न झाला.
या लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाच्या बुलेट गाडीचा विजेता बार्शी येथील सुनिल कदम हा ठरला असून कदम यांनी पत्नीसह येऊन बुलेट गाडी स्विकारली, द्वितीय क्रमांकाचे बक्षिस फ्रिज तांबेवाडी येथील निलेश जाधवर यांना मिळाले तर तृतीय क्रमाकांचे बक्षिस टीव्ही हा बार्शी येथील सचिन मिरगणे यांना मिळाला.यासोबतच मोबाईल,कुलर, वॉटर फिल्टर, सायकल, मिक्सर, फॅन, गॅस शेगडी, घडयाळ, पोळी डब्बा, जार,कुकर, पुडींग सेट, चौरंग आदी बक्षिसे ग्राहकांना लक्की ड्रॉ द्वारे देण्यात आली.
कार्यक्रमात उद्योजक महेश यादव यांची कन्या अनुष्का यादव हिचा दहावा वाढदिवस माजी मंत्री दिलीप सोपल व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते पुष्पहार घालून व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

खास ग्राहकांसाठी कॉमेडी किंग राहुल इंगळे यांच्या कार्यक्रमात उडाले हस्याचे प्रचंड फवारे पहायला मिळाले तसेच कार्यक्रमाचा दिलखुलास आनंद लुटला यावेळी महिला व पुरुष यांनी कार्यक्रमात उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदवित विविध स्पर्धात आपली कला सादर करीत प्रोत्साहन पर बक्षिसे मिळविली. कार्यक्रमासाठी माजी मंत्री दिलीप सोपल, वाशीचे नगराध्यक्ष निश्चित तात्या चेडे, स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे, संचालक बाळासाहेब आडके, नगरसेवक विलास रेणके, प्रशांत कथले,नाना वाणी, मनीष चौहान आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण रामराव पाटील यांचा हसमुखराव हा बोलका बाहुल्याचा कार्यक्रम, स्वरतरंग हिंदी व मराठी गाण्याची मैफिल तसेच शारदीय या संस्थेचा नृत्याविष्कार या सर्व कार्यक्रमास उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमास बार्शी शहर व तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील ग्राहकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती. बुलेट गाडी विजेता सुनिल कदम यांना पत्रकार संतोष सुर्यवंशी यांच्या हस्ते बुलेट गाडीची चावी देण्यात आली. यावेळी गणेश भोळे, सुरज ढमढेरे, विवेक गजशीव उपस्थित होते.
उद्योजक महेश यादव,गणेश नान्नजकर, संतोष जाधवर,बाळासाहेब कामटे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार केला व ग्राहकांचे स्वागत केले. कार्यक्रमात सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश यादव यांनी केले तर आभार संतोष जाधवर यांनी मानले. लकी ड्रॉ कार्यक्रमासाठी पुरुष व महिला ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या