पंढरपूरमदतमहाराष्ट्रसोलापूर

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मध्यरात्री घटनास्थळी भेट; बचावकार्याचा घेतला आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करणार; जिल्ह्यातील सर्व विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाला निर्देश

पंढरपूर, दि. १६ नोव्हेंबर : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी मध्यरात्री एक वाजता घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांकडून शोधकार्याचा सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

आंबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली अडकले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल तसेच संबंधित बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत रांझणी येथील सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे हे दोन कामगार मृतावस्थेत आढळून आले, तर अनवली येथील अन्य दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते.500पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्यातील अडचणी, उपलब्ध यंत्रणा, शोधकार्याची प्रगती आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी असून मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विहीर खोदकाम आणि ब्लास्टिंगच्या परवानगीची चौकशी होणार

विहीर खोदकामासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती का, ब्लास्टिंग करण्यास परवानगी होती का, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता अशा प्रकारे काम सुरू असेल, तर ती गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.500सोलापूर जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी विहिरींची कामे सुरू आहेत. यामध्ये परवानगी घेऊन सुरू असलेल्या तसेच विनापरवाना खोदण्यात येणाऱ्या विहिरींची माहिती प्रशासनाने संकलित करावी. सर्व विहीर खोदकामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दगडांच्या नमुन्यांची तपासणी; ब्लास्टिंगमध्ये वापरलेल्या रसायनांचाही शोध

दरम्यान, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दुर्घटनेची समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विहिरीतून शोधकार्यादरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या दगडांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून, ब्लास्टिंगसाठी कोणत्या प्रकारचे केमिकल किंवा रासायनिक पदार्थ वापरण्यात आले होते, याचाही तपास केला जाणार आहे. त्यामुळे दुर्घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.500सोलापूर जिल्ह्यातील परवानगीप्राप्त आणि विनापरवाना सुरू असलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, संबंधित कामांची परवानगी आणि सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जाईल. आंबे येथील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाला प्राधान्य दिले आहे.

दुर्घटनेतील बचाव व शोधकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः बारा तासांहून अधिक काळ घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. बचावकार्याची प्रगती आणि आवश्यक साधनसामग्रीबाबत त्यांनी सातत्याने आढावा घेतला.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लारवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button