जयंतीमहाराष्ट्रसोलापूर

जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह उत्साहात साजरा, आदिवासी लाभार्थ्यांना लाभवितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. 15 : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्यावतीने जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने आदिवासी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांना निवडपत्र व धनादेश वितरण तसेच आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
500
यावेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी श्री. निऱ्हाळी म्हणाले, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ समाजातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा. विशेषतः महिला, विद्यार्थी व महिला बचत गटांसाठी असलेल्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी. आदिवासी समाजातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील गडचिरोली येथे हा कार्यक्रम संपन्न होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व अभिमान व्यक्त केला.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास जतन व प्रसारित करणे, समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सक्षमीकरण करणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविणे हा आहे.500प्रास्ताविकात प्रकल्प संचालक धनंजय झाकर्डे यांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आदिवासी पारधी समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी तीन आश्रमशाळा, एक सैनिक शाळा, दोन नामांकित शाळा आणि सहा वसतिगृहे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रकल्प संचालक धनंजय झाकर्डे, कार्यालय अधीक्षक सुधाकर भांगरे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप समुद्रे, आदिवासी समाजातील वैजू काळे, राजेश काळे, ज्ञानेश्वर भोसले, चव्हाण, ॲड. बबीता काळे, सामाजिक कार्यकर्त्या पार्वती काळे, ॲड. नितीन शिंदे, शाहीर शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप समुद्रे यांनी केला.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button