छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

फुलंब्री येथे गरजूंना दिवाळी शिधासंचांचे वाटप; नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री संजय शिरसाट

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी परिस्थितीत शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकाही गरजू कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. संभाव्य पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज फुलंब्री येथे दिली.

फुलंब्री नगरपंचायतीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते शहर व तालुक्यातील गरजू कुटुंबे, विधवा महिला आणि दिव्यांग नागरिकांना दिवाळी शिधासंचांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, तहसीलदार योगिता खटावकर उपस्थित होते.500पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, यंदाच्या दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी आगामी फेब्रुवारी-मार्चमध्ये टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळीच्या काळात दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राज्यभरात पाच लाख दिवाळी शिधासंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आगामी काळातही गरजेनुसार मदतकार्य सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी ५० लाखांचा निधी

फुलंब्री येथील नदीपात्रातून गाळ काढण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा पालकमंत्री शिरसाट यांनी केली. हे काम २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.500नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. या कामासाठी स्थानिक विकास निधीतून यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचीही विनंती त्यांनी केली. नदीपात्रातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे ठोंबरे यांनी सांगितले.

चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजित घोडके यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास माजी महापौर त्रिंबक तुपे, नंदकुमार घोडले, अश्फाक पटेल, अजगर पटेल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, महिला व नागरिक उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button