बार्शीमहाराष्ट्र

दिव्यांग बांधवांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करा! मासिक पेन्शन ५ ते ६ हजार रुपये करण्याची आमदार राजेंद्र राऊत यांची मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी; दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडेही वेधले लक्ष

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : दिव्यांग बांधवांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करून ती ५ ते ६ हजार रुपये करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी विधानपरिषद सदस्य आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण तथा दिव्यांग विकास मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.500

राज्यातील दिव्यांग बांधवांना शासनाकडून मिळणारे मासिक आर्थिक सहाय्य सध्याच्या वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरे पडत आहे. त्यामुळे दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांचे मासिक पेन्शन किमान ५ हजार ते ६ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.500यासोबतच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीचा प्रभावी वापर करण्यात यावा, त्यांना घरकुल सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत द्यावी, तसेच शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा अधिक सक्षम कराव्यात, अशा महत्त्वपूर्ण मागण्या त्यांनी केल्या आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे.500दिव्यांग बांधवांना केवळ आर्थिक मदत देणे पुरेसे नसून त्यांना सन्मानाने जगता यावे, स्वावलंबी होता यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता यावे, यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पेन्शनवाढीसह अन्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ते आदेश काढावेत, अशी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे. दिव्यांग बांधवांना आर्थिक दिलासा मिळण्यासह त्यांच्या शिक्षण, आरोग्य, निवास आणि रोजगाराच्या प्रश्नांनाही न्याय मिळावा, या दृष्टीने आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button