अमरावतीमहाराष्ट्रसण

अमरावतीच्या वडरपुरा येथील वस्तीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कष्टकरी महिलांसमवेत साजरी केली दिवाळी भाऊबीज

वनजमिनीचे पट्टे महसूल विभागामार्फत कष्टकऱ्यांना मोफत देण्याचा केला निर्धार!

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अमरावती : राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडरपुरा येथील कष्टकरी महिलांसमवेत दिवाळी भाऊबीज साजरी केली. यावेळी कष्टकरी महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. 40 वर्षापासून वन विभागाकडे नोंदलेल्या जमिनी महसूल विभाग ताब्यात घेऊन संजय नगरातील गोरगरीब जनतेला घर बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी येत्या 27 तारखेला विशेष बैठक घेण्यात येईल अशी घोषणाही पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केली.500

दिवाळीचा सण यावर्षीच्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेमध्ये जाऊन साजरा करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी अचलपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून सायंकाळी अमरावती शहरातील वडरपुरा येथील कार्यक्रमास उपस्थित झाले. यावेळी हजारोच्या संख्येने या परिसरातील कष्टकरी महिला उपस्थित होत्या.

सर्व उपस्थित महिलांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगिन विकासाचा संकल्प केला असून अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रश्न मार्गी लावले जात आहेत. शेतकरी आणि शेतमजूर हा विकासाचा केंद्रबिंदू मानून गोरगरीब कष्टकरी वर्गाला आधार देण्यात येणार आहे. वडार समाजाच्या मुलांना 700 ब्रासपर्यंत दगड-गोटा रॉयल्टी शिवाय मोफत देण्यात येणार आहे. अशी सवलत कुंभार समाजाला यापूर्वी देण्यात आली असून ई-श्रम कार्ड, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ या कष्टकऱ्यांना देण्यात येणार आहे. वन विभागाच्या जमिनीच्या बदल्यात महसूल विभाग जमिनी देऊन अशा जमिनी समाज घटकाला दिल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. अडीच लाख रुपयांचे अनुदान घर बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात येईल व त्यांना पुढील 20 वर्षे वीज बिल शून्य येईल अशा सूर्यघर योजनेचा लाभ देण्यात येईल. या माध्यमातून वडार समाजाच्या उन्नतीचे ध्येय साध्य करण्यात येईल असेही ते म्हणाले.5001 जानेवारी, 2011 पूर्वी ज्या ज्या जमिनीवर घर बांधून राहत असेल अशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना असल्याचे सांगून पालकमंत्री बावनकुळे यांनी रहिवाशांना 1 हजार रुपयांमध्ये रजिस्ट्री करून देण्यात येईल यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करून रजिस्ट्री करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

प्रारंभी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पालकमंत्र्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.500

प्रास्ताविकपर भाषणात आमदार रवी राणा यांनी गोरगरीब कष्टकरी महिलांसमवेत दिवाळी भाऊबीज साजरी करण्याचा मनोदय व्यक्त करून उपस्थित राहिल्याबद्दल पालकमंत्री बावनकुळे यांचे आभार मानले व या भागातील अडीअडचणी सांगितल्या.

यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते 2027 सालच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. पालकमंत्री यांच्या समवेत सर्व मान्यवरांनी यावेळी फुलझडी पेटवून प्रतीकात्मक दिवाळी साजरी केली. भाऊबीज भेट म्हणून यावेळी महिलांना माहेरची साडी आणि किराणा वाटप करण्यात आले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button